Breaking News

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी अद्याप फरार

श्रीगोंदा, दि. 01 - तालुक्यातील महादेव वाडी येथील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लाऊन पळून नेउन त्याच्यावर अत्याचार करणारे आरोपी अद्याप फरार असल्याने या आरोपीना तातडीने अटक करावी तसेच पीड़ित मुलीचा पुन्हा जबाब नोंदवण्यात यावा व सर्व आरोपीवर कारवाई करण्याबाबत निवेदन पीडत मुलीचे पालकानी पोलिस अधीक्षक यांना दिले आहे
श्रीगोंदा तालुक्यातील महादेव वाडी येथील अल्पवयीन मुलीला फूस लाउन पळून नेउन तीच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यात आला याबाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल होऊन देखील यातील अत्याचार करणारा आरोपी सागर रमेश  माने याला पोलिसांनी अटक केली असली तरी त्याचे अन्य साथीदार सागर कसबे गावातील  अन्य दोन गुन्हेगारी प्रव्रुत्तीचे तरुण  गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन अद्याप सापडले नाहीत .यातील गुन्हेगार आड़दांड असून ते आमच्या कुटुंबावर दबाव आनत आहेत .यातील आरोपी फरार आहेत ते श्रीगोन्द्याच्या आसपास फिरत असताना आरोपी अटक होत नाहीत .श्रीगोंदा तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असताना पोलिसात गुन्हे दाखल होऊनही पीड़ित कुटुंबाला न्याय मिळत नसल्याने या अल्पवयीन मुलीच्या पालकानी जिल्हा पोलिस अधीक्षक ,गृहराज्यमंत्री राम शिंदे यांना निवेदन पाठवले आहे.यात पीड़ित मुलीचा पुन्हा जबाब घेण्यात यावा उर्वरित आरोपीना तातडीने अटक करण्यात यावी आमच्या कुटुंबाला त्रास देणार्‍याचे बंदोबस्त करण्यात याव व पीडत मुलीला न्याय मिलावा असे म्हंटले आहे.