दुष्काळाच्या ढिगभर गप्पा मारण्यापेक्षा मुठभर केलेली कृती श्रेष्ठ - काकडे
अहमदनगर, दि. 06 - दुष्काळाच्या ढिगभर गप्पा मारण्यापेक्षा मुठभर केलेली कृती श्रेष्ठ आहे. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आलेल्या नैसर्गिक संकटातून शेतकरी बांधवांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील जनता दुष्काळाने होरपळत असताना जीवनधारा हॉस्पिटलच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात टॅकरद्वारे मोफत पाणी वाटपाचा उपक्रम सामाजिक विचारधारेशी जुडलेला असल्याचे प्रतिपादन साहित्यिक सीताराम काकडे यांनी केले.
नगर-मनमाड रोड येथील जीवनधारा हॉस्पिटलच्या वतीने नगर तालुक्यातील मांडवा व साकत या दुष्काळग्रस्त भागात टॅकरद्वारे मोफत पाणी वाटपाच्या उपक्रमास गुरुवार दि. 2 जून रोजी प्रारंभ करण्यात आला यावेळी काकडे बोलत होते. याप्रसंगी ह्रद्यरोग तज्ञ डॉ.प्रमोद जगताप, डॉ.सागर भालेराव, संजय निमसे, डॉ.सागर भालेराव, प्रमोद आव्हाड, डॉ.महेश वीर, झुंबरराव पवार, साकतचे मा.सरपंच श्रीधर पवार, अशोक शिंदे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ.प्रमोद जगताप म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत हॉस्पिटलच्या वतीने गरजू रुग्णांसाठी विविध वैद्यकिय शिबीर राबविण्यात येत आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनता तीव्र दुष्काळाचा सामना करत असताना त्यांना मदतीचा हात देण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला आहे. इतर दुष्काळी भागात देखील मागणी नूसार पाणी पुरवठा केला जाणार असून, प्राण्यांसाठी देखील पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध वैद्यकिय मोफत शिबीर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाद्वारे मांडवा व साकत गावाला 25 हजार लि. क्षमतेच्या टँकरद्वारे मोफत पाण्याचे वाटप केले जाणार आहे.