प्रियांका चोप्रा ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’
मुंबई, दि. 18 - बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत आपल्या मेहनतीने सर्वांचे डोळे दिपवणारी प्रियंका चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या माजी विश्वसुंदरीला मॅक्झिम इंडिया मासिकाने ‘हॉटेस्ट वुमन इन द वर्ल्ड’चा मान दिला आहे. या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकण्याची प्रियांकाची ही तिसरी वेळ आहे. ‘क्वांटिको’ स्टार प्रियांका सध्या या मासिकाच्या कव्हर पेजवरून सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत आहे. जून, जुलैच्या एडिशनमध्ये प्रियांका कव्हरगर्ल म्हणून झळकली असून, प्रियांकाने यासाठी ‘मॅक्झिम’चे आभारही मानले आहेत.
