कुंबळे प्रेरणादायी प्रशिक्षक : रोहित शर्मा
मुंबई, दि. 30 - गेल्या दोन वर्षांपासून अनिल कुंबळ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स चे मेंटॉर आणि प्रशिक्षक आहेत त्यामुळे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. कुंबळे खूप प्रेरणादायी आहेत,’’ अशा शब्दांत भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने आपल्या नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे कौतुक केले.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना रोहित म्हणाला, “कुंबळे निवृत्त
होण्याआधी मला काहीकाळ त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. 2008 साली झालेल्या श्रीलंकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात कुंबळेच्या नेतृत्त्वाखालील संघात माझा समावेश होता. त्यांनी ज्याप्रकारे क्रिकेट खेळले, ते खूप प्रेरणादायी आहे. ते लोकांना प्रेरीत करुन आव्हान स्वीकारण्यास तयार करतात.’’
त्याचप्रमाणे, “कुंबळे प्रशिक्षक व मेंटॉर म्हणून आपल्यासोबत कायम असतात. कधीही हार न मानण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे युवा खेळाडूंना त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळेल. ते अखेरच्या चेंडूपर्यंत लढतात आणि आपल्या खेळातूने कुंबळे हाच संदेश कायम देतात,’’ असेही रोहितने यावेळी सांगितले.