Breaking News

कसोटी क्रिकेट भक्कम करणार : अनिल कुंबळे

बेंगळुरू, दि. 30 - कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी यंदाचे सत्र अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंना घडविणे हे आपल्यापुढील  पहिले आणि अवघड आव्हान आहे. असे टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपले मत पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले आहे. 
वर्षभरासाठी कोचपद सांभाळल्यानंतर बोलविलेल्या अधिकृत पत्रकार परिषदेत कुंबळे म्हणाले,‘कसोटी क्रिकेट भक्कम करण्यास माझे प्राधान्य असेल. जे खेळाडू  गेल्या काही महिन्यात अनेक टी-20 सामने खेळले त्यांना कसोटीसाठी तयार करणे हे माझ्यापुढील मोठे आव्हान असेल. चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळविणे  माझ्याइतकीच भारतीय संघाची जबाबदारी असेल. हा प्रकार अधिक रोमहर्षक झाल्यास चाहते कसोटी क्रिकेटकडे परत येतील.’ कुंबळे पुढे पहिले आव्हान वेस्ट  इंडिज दौरा ही आहे. या दौर्‍यात भारतीय संघ मालिका जिंकेल, असा आशावाद व्यक्त करीत कुंबळे पुढे म्हणाले, ‘विंडीज दौ-यासाठी आम्ही सज्ज आहोत.  विंडीजमधील खेळपट्ट्या भारतासारख्याच आहेत असेहि कुंबळे म्हणाले.