रायगडच्या 500 कोटींच्या विकास आराखड्यास मंजुरी
रायगड, दि. 07 - कोकण विभागीय आयुक्तांनी रायगड किल्ला आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेल्या 500 कोटी रुपयांच्या आराखड्यास आपण याच ठिकाणी मंजुरी देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा आज साजरा करण्यात आला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवप्रेमींना याप्रसंगी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासन कटिबध्द असून कुठलीच कमतरता पडू दिली जाणार नाही याची टाळ्यांच्या गजरात ग्वाही दिली. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, शिवराज्याभिषेक समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील तटकरे, जयंत पाटील, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली उगले तसेच रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.