मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे; अपघातात 17 जणांचा मृत्यू
मुंबई, दि. 05 - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रवासी बस, इनोव्हा व स्वीफ्ट कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. तर, 19 जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलजवळील शिवकार गावाजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने इनोव्हा आणि स्वीफ्ट कारला धडक दिली. त्यामुळे या तिन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात कोसळल्या. या अपघातात 17 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 महिला, सहा पुरुष व एक सहा महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. अपघातात 19 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. निखील ट्रॅव्हल्सची ही प्रवासी बस असून, ती सातार्याहून मुंबईकडे जात होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे.