राज्यात यंदा 102 टक्के पाऊस
पुणे, दि. 02 - जून ते सप्टेंबर या काळात यंदा महाराष्ट्रात सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ व महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात मात्र सरासरीच्या कमी पाऊस होणारा असून महाराष्ट्रात तो 97.16 टक्के तर कोकण विभागात 98 टक्के पडेल, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.
डॉ. साबळे हे गेली अनेक वर्षे त्यांच्या अभ्यासावर आधारित महाराष्ट्रात होणा-या पावसाचा अंदाज व्यक्त करतात. डॉ. साबळे यांनी कमाल तापमान, सकाळ व दुपारची आद्रता, वा-याचा वेग आणि सूर्य प्रकाशाचा कालावधी या निकषांवर यंदाचा अंदाज पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. या वर्षी मान्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव जून महिन्यात कमी व जुलै महिन्यात अत्यंत कमी राहणार असल्याने जून व जुलै महिन्यांत पावसात खंड पडेल तसेच मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त तापमान व वा-याचा वेग कमी आढळल्याने मान्सूनचे आगमन उशिरा झाले तरी पुढे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत चांगल्या पावसाची शक्यता असून कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काल पावसात खंड, असे हवामान राहील, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.