Breaking News

संघाचे पिल्लू आहेत बाबासाहेब पुरंदरे - नितेश राणे

अहमदनगर, दि. 28 -  शिवसेना-भाजपचे बाबासाहेब पुरंदरे यांना मोठे करण्यात मोठा हात असून बाबासाहेब पुरंदरे हे संघाचे पिल्लू असल्याची टीका काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी नगर येथे केली.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पुरंदरे यांनी नेमके काय लिहिले ? काय केले ? हे आधी तपासा. यांनी आपली घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे पुस्तके छापून, ती विकून चालविली. अशा पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल टीका करतानाच राणे यांनी याबद्दल मराठा पेटून उठत नाही, अशी खंत व्यक्त केली. विनोद तावडे हे मराठा असल्याची लाज वाटते. राज्यातील सेना-भाजप सरकार आरक्षण देणार नाही. आरक्षणासाठी जाट पेटले, असा मराठा पेटत नाही, असे सांगत त्यांनी तरूणांना मैदान मारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.