दुसर्याचे जीवन वाचविण्याचा सोपा मार्ग रक्तदान
। जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सोनवणे
अहमदनगर, दि. 30 - बदलत चाललेल्या जीवन पद्धतीमध्ये माणुस फार व्यस्त झालेला आहे, त्याला स्वत:च्या कुटूंबाला वेळे देणे सुद्धा होत नाही, अशावेळी समाजामध्ये दुसर्यासाठी काही करणे हे स्वप्ननच समझ्याची वेळ आली आहे, पण या परिस्थितीत सुद्धा दुसर्याचे जीवन वाचविण्याचा सोपा मार्ग म्हणजे रक्तदान आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एस.एम.सोनवणे यांनी केले.मिसगर मेडिकल फौंडेशनच्यावतीने अहमदनगर स्थापना दिनानिमित्त सिव्हील हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या सहाय्याने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ.सोनवणे बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सईद काझी, डॉ.दमन काशिद, अभिजित वाघ, इंजि.अनीस शेख आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.सोनवणे म्हणाले, रक्तदानाबद्दल अजून सुद्ध समाजामध्ये बरेच गैरसमज आहेत. ते सामाजिक कार्य करणार्यांनी दूर करण्याची गरज आहे. आज अपघाताचे प्रमाण दिवसेंदिव वाढत चालले आहेव त्यामुळे रक्ताची गरज जास्त भासत आहे, पण रक्तदात्यांचे प्रमाण त्या तुलनेत फार कमी आहे, म्हणून रक्तदानाबद्दलचे गैरसमज दूर करुन रक्तदान करणार्यांची संख्या वाढली पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रास्तविक करताना मिसगर मेडिकल फाऊंडेशनचे युनूस तांबटकर म्हणाले की, प्रत्येक समाजामध्ये महान व्यक्तींच्या जयंती - पुण्यतिथी व इतर बरेच कार्यक्रम घेतले जातात, पण प्रत्येक संघटनेने वर्षातून दोनदा तरी रक्तदान शिबीर घेतले पाहिजे व समाजाचे देणे म्हणून प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजेत, असे नमुद केले. यावेळी डॉ.सईद काझी म्हणाले, रक्तदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. प्रत्येकाने वर्षात एकदा तरी रक्तदान केले पाहिजे रक्तदान केल्याने रक्तदात्याचेही आरोग्य चांगले राहते. आज वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन उपचार पद्धती येत असल्याने एका रक्तपिशवीतून अनेक घटक वेगवेगळे करुन त्याचा वेगवेगळ्या रुग्णांना फायदा होतो. त्यामुळे रक्तदानाचे महत्व आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.