डॉ. राजेंद्र सरकाळे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा पुरस्कार
सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : इश्वरपूर येथील महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे कृषी व सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा दी प्राइड ऑफ इंडिया भास्कर अॅर्वार्ड 2016 ने जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना सन्मानित केले. गोवा येथे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, माजी सभापती शंभू बांदेकर, जर्नालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, उपाध्यक्ष इलाही मोमीन उपस्थित होते. त्यांचे शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, विलासराव उंडाळकर, आमदार शशिकांत शिंदे, प्रभाकर घार्गे, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर, सुनील माने, दादाराजे खर्डेकर आदींनी अभिनंदन केले.