दागिने खरेदीवरील टीसीएस मागे घेतला जाणार?
नवी दिल्ली, दि. 01 - केंद्र सरकारने दागिने खरेदीवरील टीसीएस (टॅक्स कलेक्शन अॅट सोर्स) मागे घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू केला असून त्यामुळे दागिने खरेदीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकारने नवीन कररचनेत दोन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या दागिने खरेदीवर 1 टक्का टीसीएस लावला होता. हा कर 1 जूनपासून वसूल केला जाणार होता. मात्र त्याविरोधात सराफ व्यावसायिकांनी दीर्घ संप करून हा कर रद्द करण्याची मागणी केली होती. दागिन्यांवर लादली गेलेली 1 टक्का एक्साईज ड्यूटी रद्द करण्याचीही सराफांची मागणी होती ती मात्र सरकारने मान्य केलेली नाही.
सरकारने पूर्वीच्या नियमाप्रमाणे 5 लाखांपर्यंतच्या रोख दागिने खरेदीवर टीसीएस न आकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. परिणामी दागिने खरेदीला चालना मिळून त्यात वाढ होईल असे सांगितले जात आहे.