1 जूनपासून उडणार महागाईचा भडका
नवी दिल्ली, दि. 01 - आजपासून अतिरिक्त भारासह सेवाकरात केलेली वाढ लागू होत असल्याने महागाईचा भडका उडणार आहे. आजपासून सेवाकर आता 15 टक्के होणार झाल्यामुळे टेलिफोन सेवा, रेस्टॉरंटमधील खाणे, पिणे, चित्रपट, ब्युटी पार्लर, विमान प्रवास, विमा, डीटीएच सेवा, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड, कुरियर, आरोग्य केंद्रे, बँकिंग
सेवा, सल्लामसलत यासारख्या सेवा महागणार झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
यासोबतच 10 लाख रुपयांवरील कार खरेदीसाठी 1 टक्के अधिक रक्कम भरावी लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016-17 च्या अर्थसंकल्पात सेवाकर 12.36 टक्क्यांवरून 14 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासोबतच 1 टक्के कृषि कल्याणचा अधिभार टाकण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला. या अगोदर 15 नोव्हेंबर 2015 पासूनच स्वच्छ भारतचा अधिभार आहे. त्यात कृषि कल्याणच्या अधिभाराची भर पडली आहे. त्यामुळे जनतेला विविध सेवांच्या माध्यमातून 15 टक्के सेवा कर भरावा लागणार आहे. यातूनच 1 जूनपासून महागाईचा भडका उडणार आहे. एकीकडे अच्छे दिनचे स्वप्न दाखवतानाच मोदी सरकार विविध अधिभाराच्या माध्यमातून जनतेवर अतिरिक्त भार टाकून जनतेच्या खिशातूनच पैसा काढत असल्याने लोकांधून संताप व्यक्त होत आहे.
अर्थसंकल्पात जेटली यांनी सर्व करयोग्य सेवांवर अर्धा टक्के कृषि कल्याण अधिभार लावण्यात येत आहे. सोबतच 10 लाख रुपयांपर्यंतच्या कारवरही एक टक्के अधिभार लावण्यात येत आहे. त्यामुळे 10 लाख रुपयांवरील किमतीच्या कारच्या किमती उद्यापासून वाढणार आहेत. अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 100 रुपयांच्या सेवांवर 50 पैसे कृषि कल्याण अधिभार लावला जाणार आहे. सेवा करात वाढ करण्याचा मुख्य उद्देश जीएसटीला अपेक्षित असलेला 17 ते 18 टक्के करांच्या आसपास नेणे हा आहे, असेही सांगण्यात आले.
केंद्र सरकारने 1 जूनपासून सर्वच सेवांवर कृषि कल्याण कराचा अतिरिक्त भार लागू केला आहे. हा अधिभार सेवा कराचा भाग म्हणून नव्हे, तर स्वच्छ भारत करासारखे सेवेचे मूल्य म्हणून घेण्यात येणार आहे. या करातून संकलित करण्यात येणारा निधी केंद्राकडून कृषि क्षेत्राच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी तसेच शेतक-यांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणा-या योजनांमध्ये वापरला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. या नव्या अप्रत्यक्ष करामुळे ग्राहकांवर 20, 600 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोझा पडणार आहे.