Breaking News

विनाअनुदानित सिलिंडर 21 रुपयांनी महाग

नवी दिल्ली, दि. 01 - पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ आता तेल कंपन्यांकडून विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरातदेखील तब्बल 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे.
विनाअनुदानित सिलिंडर 21 रुपयांनी महाग झाल्याने नवी दिल्लीत सिलिंडरसाठी 548.50 रुपये मोजावे लागणार आहेत. शिवाय, जेट इंधनाच्या किंमतीतदेखील 9.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पेट्रोलच्या दरात मंगळवारी मध्यरात्रीपासून लिटरमागे 2.58 रुपये; तर डिझेलच्या दरात लिटरमागे 2.26 रुपये वाढ करण्यात आली. यानुसार दिल्लीत पेट्रोलचा दर 65.60 रुपये प्रतिलिटर; तर डिझेलचा दर 53.93 रुपये प्रतिलिटर असेल, असे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) जाहीर करण्यात आले आहे.