श्रीलंकन गोलंदाज इरंगाची गोलंदाजी संशास्पद
चेस्टर ली स्ट्रीट, दि. 01 - श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शमिंडा इरंगाविरुद्ध9 सदोष गोलंदाजी शैलीसाठी तक्रार करण्यात आली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी याची माहिती दिली. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमावणार्या श्रीलंका संघासाठी हा आणखी एक धक्का आहे.
या 29 वर्षीय गोलंदाजाच्या शैलीची तक्रार दुसर्या कसोटी सामन्यानंतर करण्यात आली. सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 9 गडी राखून विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आयसीसीने स्पष्ट केले, की सामनाधिकार्यांनी दिलेल्या अहवालात या 29 वर्षीय गोलंदाजाच्या शैलीवर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. हा अहवाल श्रीलंका संघव्यवस्थापनाकडे सोपविण्यात आला आहे.
इरंगाने पहिल्या डावात श्रीलंकेच्या गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने 27 षटकांत 100 धावा बहाल केल्या. त्याला बळी घेता आला नाही. दुसर्या डावात त्याने केवळ एक षटक टाकले. आयसीसीच्या नियमानुसार इरंगाला आता आगामी 14 दिवसांमध्ये आपल्या गोलंदाजी शैलीची चाचणी द्यावी लागेल. चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करू शकतो. त्यामुळे 9 जूपासून लॉर्ड्समध्ये खेळल्या जाणार्या तिसर्या कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध राहील; पण त्यानंतर होणार्या मर्यादित षटकांच्या मालिकेत त्याला खेळता येणार नाही. इरंगाने आतापर्यंत 18 कसोटी सामने खेळले असून, 53 बळी घेतले आहेत.