सेन्सेक्समध्ये 100 अंशांनी वधरला
मुंबई, दि. 30 - मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये 100 अंशांनी वधारला असून, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 8200 अंशांची महत्त्वपूर्ण पातळी गाठली आहे. मेटल कंपन्यांच्या शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला अधिक चालना मिळाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 118.20 अंशांनी वधारुन 26,771.80 अंशांवर व्यवहार करत आहे. निफ्टीदेखील 8,193.05 अंशांवर व्यवहार करत असून 36.40 अंशांनी वधारला आहे. एफएमसीजी आणि कॅपिटल गूड्स क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर तेजीत आहेत. एफएमसीजी व कॅपिटल गूड्स क्षेत्रातदेखील किरकोळ घसरण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत जाहीर झालेल्या तिमाही निकालांचा आज शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे.
हिंडाल्को इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात यंदा तब्बल 123 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला सुमारे 356 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे निफ्टीवर हिंडाल्कोचा शेअर सर्वाधिक तेजीत आहे. शिवाय, कोल इंडिया, एसबीआय, टाटा मोटर्स आणि अरबिंदो फार्माचे शेअरदेखील तेजीत आहेत. दुसरीकडे, भेल, आयटीसी, एचडीएफसी, झी एन्टरटेनमेंट व एल अँड टीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.