ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्सच्या शालेय स्वच्छता कार्यक्रमाची नाशिक येथे सुरूवात
नाशिक, दि. 23 - ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लिमिटेड ने 22 एप्रिल रोजी नाशिक येथील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर येथे आपल्या शालेय स्वच्छता उपक्रमाची सुरूवात केली. ह्या उपक्रमाचा भाग म्हणून शाळांमध्ये स्वच्छतेला चालना देण्यासाठी
जीएसके आपली सीएसआर भागीदार हेविटॅट फॉर ह्युमॅनिटी इंडिया ट्रस्टसोबत काम करत आहे. ह्या उपक्रमांतर्गत स्वच्छतागृहांचे बांधकाम/दुरूस्ती यांचा समावेश असून मुले, शिक्षकवर्ग आणि अन्य कर्मचारी वर्गाला मुलभूत आरोग्य आणि स्वच्छता पध्दतींबाबत संवेदनशील बनवण्यावरही लक्ष केंद्रित करण्यात येते. ह्या उपक्रमाचा 10 हजार हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार असून समुदायांमध्ये प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा प्रचार करण्याच्या जीएसके इंडियाच्या वचनबध्दतेचा, हा उपक्रम एक अविभाज्य भाग आहे. स्वच्छता पध्दतींमध्ये सकारात्मक बदल आणि सोबत सुविधांच्या उपलब्धतेची मुलांना मदत होईल आणि त्यामुळे बंद स्वच्छतागृहांच्या फायद्यांबाबत त्यांचे परिवारही संवेदनशील बनतील. ऑक्टोबर 2016 मध्ये ह्या उपक्रमाच्या पूर्ततेनंतर ही स्वच्छतागृहे शाळेच्या अधिकार्यांना सुपूर्त केली जातील आणि मग ते ह्या उपक्रमाच्या अंमलबजावणी भागीदाराच्या मार्गदर्शनाखाली ह्या ुपक्रमावर देखरेख ठेवतील. नाशिकमधील पुढील पाच अंशतः शासन अनुदानित शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे बांधकाम/दुरूस्ती करण्यात येईल.
एम्.आर्.सारडा कन्या विद्या मंदिर, सीडीओ मेरी हायस्कूल, सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, ाश्रम शाळा वेळुंजे - प्रायमरी स्कूल, आश्रमशाळा वेळुंजे - सेकंडरी स्कूल. शुक्रवारी सकाळी शालेय स्वच्छता कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आ. बाळासाहेब सानप, ग्लॅसोस्मिथक्लाईनचे व्हाईस प्रेसिडेंट व मॅनेजिंग डायरेक्टर ए. वैधिश उपस्थित होते.