Breaking News

सातपूरला महावीर जयंतीनिमित्त मिरवणुक

नाशिक, दि. 23 - सातपूर परिसरातील सर्व पंथांतील समाजबांधव एकत्र येऊन यावर्षीदेखील भगवान महावीर यांचा जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
जयंतीनिमित्त सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकातून मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी आमदार सीमा हिरे, माजी आमदार जयप्रकाश छाजेड, माजी महापौर दशरथ पाटील, स्थायी स
भापती सलीम शेख, पुणे येथील विक्र ी कर विभागाचे सहायक आयुक्त सुमेरकुमार काले, प्रभाग सभापती सविता काळे, नगरसेवक दिनकर पाटील, उषा शेळके, सुरेखा नागरे, शिवसेना उपमहानगर प्रमुख लोकेश गवळी, भाजपा मंडल अध्यक्ष राजेश दराडे, रामहरी संभेराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत दिगंबर जैन, श्‍वेतांबर जैन, माहेश्‍वरी समाज संघ, स्थानकवासी संघ, अग्रवाल समाज संघ, राजस्थानी ब्राह्मण समाज संघ, राजस्थानी सेन समाज संघ आदि सर्व समाजबांधव सहभागी झाले होते.
या मिरवणुकीचा समारोप रामजी हॉल येथे करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोलकचंद भंडारी, सुनंदा लोहाडे, रमेश ठोळे, रतिलाल राका, कपिल लाहोटी, किरण बद्दर, राजेश धूत, अतुल बकलीवाल, मंगल ठोळे, शैलेश दगडे, दिलीप कटारिया, राजेंद्र चोपडा, जितेंद्र दगडे, महेश ठोळे, प्रवीण सुराणा, मीना दगड आदिंसह समाजबांधव सहभागी झाले होते. प्रास्ताविक प्रमोद लोहाडे यांनी केले. सूत्रसंचालन लोकेश कटारिया यांनी केले. स्वागत दिलीप दगड व महेंद्र राका यांनी केले. दिलीप जैन यांनी आभार मानले.