Breaking News

चांडक-बिटको महाविद्यालयात पदवीग्रहण समारंभ सोहळा संपन्न

नाशिक, दि. 23 - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चांडक-बिटको महाविद्यालयात प्रथम पदवीग्रहण समारंभ सोहळा नुकताच संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सनदी लेखापाल मुकुंद कोकीळ, गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, डॉ. अंजली गौतम, प्रा. सुरेंद्र घाटपांडे, प्रा. संजय मिरजकर, विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. आर. बी. पगारे, प्रा. वांजळे, प्रा. डी. एम. पठाण, विद्यार्थी प्रतिनिधी रोहन जाधव उपस्थित होते.
यावेळी प्रमुखपाहुण्यांच्या हस्ते 17 स्नातकांना पदवीप्रदान करण्यात आली. तर 265 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक प्राचार्य राम कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विद्युल्लता हांडे व आभार प्रा. शायोन्ती तलवार यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी प्रा. ओंकार भावसार, डॉ. सुनील देवधर, प्रा. सुनील जोशी, प्रा. संजय चपळगावकर, प्रा. शशिकांत खेमनर, दीपक चौधरी, प्रा. विजय सुकटे, प्रा. नरेश पाटील, प्रा. सुधाकर बोरसे आदि उपस्थित होते.