जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात आता गूळ पाणी देऊन स्वागत
अहमदनगर, दि. 17 - कामानिमित्त जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात जिल्हाभरातून शेतकरी येत असतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, जीवाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत दमून भागून तालुका स्तरावरून कार्यालयात येणार्या शेतकर्यांचे आगत्यपूर्वक स्वागत केले जाणार आहे. गूळ पाणी देऊन शेतकर्यांचे स्वागत केले जाईल. नगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्याबरोबरच तालुका स्तरावरील प्रत्येक कृषी कार्यालयात अशा पद्धतीने गूळ पाणी देऊन शेतकर्यांचे स्वागत केले जाणार आहे.
नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात भेटीसाठी येणार्या शेतकर्यांचे गुळ पाणी देऊन स्वागत करण्यात येत असून, त्याचा शुभारंभ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बर्हाटे, कृषी उपसंचालक आर. के. गायकवाड, तंत्र अधिकारी अशोक संसारे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी शेतकरी आश्रू सांगळे, राजू खाडे, श्रीहरी सांगळे, रमेश नवगिरे, विजय सांगळे, अशोक तनपुरे, सुदाम जायभाय, रामभाऊ खाडे आदी शेतकर्यांचे गूळ पाणी देऊन केला. यावेळी बोलताना श्री. बर्हाटे म्हणाले की, पूर्व परंपरेनुसार घरी आलेल्या पाहुण्यांचे गूळ पाणी देऊन स्वागत केले जात असे. ही परंपरा आता लोप पावत चालली आहे. जुन्या रुढी परंपरा जतन करून महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपवणूक व्हावी, ती अधिक फुलावी या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. गुळ आणि पाणी पिण्याला शास्त्रीय आधार असून, गूळ आणि पाणी पिणे शारीरिकदृष्ट्या लाभदायक असते, असे ते म्हणाले.