मानवी हक्काची पत्रकारिता संवेदनशील व समाधान देणारी
अहमदनगर, दि. 17 - मानवी हक्काची पत्रकारिता संवेदनशील व समाधान देणारी आहे. पत्रकारिता ही सर्व समावेक्षक असावी. पत्रकारिता सामाजिक परिवर्तनाचा विषय आहे. संवेदनशिलता जपणारे पत्रकार सामाजिक वकिलीच करत असतात. मुलभुत हक्कासाठी पत्रकार काम करणारा घटक असल्याने त्यांना संरक्षणाची आवश्यकता असून, त्यासाठी कायदा होणे आवश्यक असल्याचे मत अॅड.असिम सरोदे यांनी व्यक्त केले.
शहर प्रेस क्लब, कॉ.भास्करराव जाधव स्मृती प्रतिष्ठाण व सी.एस.आर.डी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानव अधिकार कायदे आणि पत्रकारिता या विषयावरील पत्रकारांच्या कार्यशाळेत अॅड.सरोदे बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने मराठी पत्रकार परिषदेच्या नाशिक विभागीय सचिव मीनाताई मुनोत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, सी.एस.आर.डी.चे संचालक सुरेश पठारे, निलिमा बंडेलू व्यासपिठावर उपस्थित होते.कार्यशाळेत अॅड.सरोदे म्हणाले की, बातमीदार हा पत्रकारितेचा मुख्य स्तंभ आहे. आधुनिक पत्रकारितेत बदलत जाणारे नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक आहे. आजची बातमी उद्याचा इतिहास असून, बातमीदार हा इतिहास लेखक असतो. सामाजिक विषयासाठी न्याय हक्काची गरज पडते तेंव्हा पत्रकारांना योग्य भुमिका घेण्याची वेळ येते. सामाजिक न्यायासाठी पत्रकारितेला महत्त्व प्राप्त झाले असून, प्रस्थांपिता विरुध्द असलेली पत्रकारिता लोकांना मान्य असल्याचा इतिहास आहे. समाजातील खरे-खोटेपणा दाखविण्याची व योग्य भुमिका बजावण्याची आजच्या पत्रकारितेची गरज आहे. गूढ उकळून काढण्याची शोध पत्रकारिता कमी होत चालली आहे. भारतातील राजकारणात पर्यावरणाचा प्रश्न राजकीय अजेंडा म्हणून होत नाही मात्र भारत माता की जय म्हणने हे महत्त्वाचे ठरत आहे. अल्पसंख्यांक समाजाला देश भक्त असल्याचे दाखवण्याची गरज पडत आहे. एक बातमी मोठा बदल घडवून आनू शकत असल्याचे सांगून, त्यांनी पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या विविध गुणांची, कलम 19 (1) मधील भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व अब्रुनुकसान कायद्याची माहिती दिली. प्रास्ताविकात निलामा बंडेलू यांनी कार्यशाळेची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. सुरेश पठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश देशपांडे महाराज यांनी केले. उपस्थितांचे आभार सागर शिंदे यांनी मानले. यावेळी पत्रकार, वृत्त वाहिण्यांचे प्रतिनिधी, वृत्त छायाचित्रकार,सी.एस.आर.डी. चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.