पवननगरमध्ये रामजन्म सोहळा उत्साहात
अहमदनगर, दि. 17 - पवननगर येथील श्रीराम हनुमान मंदिरात श्रीराम सेवा समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतप्रमुख नानासाहेब जाधव, आ.संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव कानडे, माजी नगरसेवक दिगंबर ढवण, निखिल वारे, श्रीराम सेवा समितीचे प्रशांत भालेराव, शिवाजीराव चव्हाण,राम कथा प्रवक्त्या ह.भ.प. रुक्मिणीआई तारु महाराज यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.
रामनवमी निमित्त सकाळी 6 वाजता श्री.सौ.राजन उत्तेकर यांच्या हस्ते श्रींचा महाभिषेक झाला. सकाळी 10 वाजता भजन सम्राट विष्णू महाराज रणमले वडुलेकर आणि सहकार्यांच्या ‘ राम रंगी रंगु या’ हा भक्ती जन्मोत्सव कार्यक्रम सादर झाला. त्यांना तबल्यावर नवनाथ लांडगे व शशिकांत शिंदे यांनी संगित साथ केली. यावेळी श्री महालक्ष्मी, सितामाई, श्री.विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या सदस्या सहभागी झाल्या होत्या.
ठिक 12 वाजता प्रभू श्रीरामचंद्र जन्म, अभंग व जन्मसोहळा झाला यावेळी उपस्थित महिलांनी टिपरी नृत्य, रामाचा पाळणा, औक्षण व आरती केली. दुपारी 1 ते 4 महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 5 वाजता श्रीराम सेवा भजनी मंडळ, पवनगरचा रामनामजप व सामुहिक हनुमान चालिसा पठन झाले. सायंकाळी 6 वाजता डॉ.बापुसाहेब कांडेकर व डॉ.नितीन साळंके यांच्या हस्ते श्रींची महाआरती झाली.