दुष्काळी भागातील जनतेला पाणी देण्याची जबाबदारी आमची : मुंडे
सातारा, दि. 23 - पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग विकासापासून वंचीत राहीला आहे. अशा वंचितांना, माण खटावसारख्या दुष्काळी भागातील जनतेला पाणी देवून विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. जलयक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केवळ पाणी द्यायचे नाही, हे अभियान एक सोपस्कर म्हणून राबवायचे नाही तर संस्कार म्हणून राबवायचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण रोहयो आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जलयुक्त शिवार अभियान माण गंगा नदी पुनर्जीवन प्रकल्प अंतर्गत दहीवडी येथील बंधार्याचे लोकार्पण श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी पालकमंत्री विजय शिवतारे, आ. प्रभाकर घार्गे, आ. जयकुमार गोरे, रोहयो व जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, अधीक्षक अभियंता सुनिल कुसीरे, जिल्हा अ
धिक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, रोहयो उपजिल्हाधिकारी पराग सोमण, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला आदी उपस्थित होते.
ग्रामविकास व जलसंधारण मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, माझ्याकडे असणार्या चारही खात्यांचे वंचीतांचे खाते असं वर्णन मी एका मुलाखतीत केल होतं. दुष्काळी भागासाठी काम करण्याची आमची जबाबदारी आहे, आणि आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. जलयुक्तशिवार अभियान अंतर्गत गावे जलयुक्त करायची आहेत. हे अभियान आता लोक चळवळ बनले आहे. या अभियानाच्या माध्यमातून गट, तट, पक्ष हे न पाहता गावातील सर्वजण गावाच्या विकासासाठी एकत्र झाले आहेत. गावच्या हक्काच्या पाण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर उतरली आहे. हे चित्र पाहून जलयुक्त अभियान अंतर्गत गावांना केवळ पाणी द्यायचे नाही, हे अभियान एक सोपस्कर म्हणून राबवायचे नाही तर संस्कार म्हणून राबवायचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
माण, खटावसारख्या भागात निश्चितपणे आम्ही शेतकर्यांना पाणी देवू त्याशिवाय उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करु शेतकर्यांनी धीर धरावा. तुमच्या शेतामध्ये सोनं पिकल्याशिवाय राहणार नाही. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सत्तेवर आहोत ते पूर्ण करणारचं असे अश्वासनही त्यांनी शेवटी दिले.
पालकमंत्री विजय शिवतारे यावेळी म्हणाले, राज्यातील दुष्काळ हटविण्यासाठी शासनाने जलसंधारण खात्याचं काम मोठ्या प्रमाणात हाती घेतलं आहे. माण, खटावला जिहे कटापूरचं पाणी मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात खूप मोठी कामं झाली आहेत. याचे दृष्यपरिणाम पुढच्या काळात चांगले दिसतील. शेतकर्याने उसासारख्या पिकाच्या मागे न जाता बागायतीकडे वळावे, ठिबकचा वापर करुन शेती करावी पुढचा काळ शेतकर्यांच्या प्रगतीचा काळ आहे, असेही ते म्हणाले.
आ. घार्गे यांनी, जिहे कटापूर, तारळी, उरमोडी, यासारख्या प्रकल्पातून पाणी देवून दुष्काळी भागातील प्रश्न संपणार आहे. जलयुक्त शिवार अभियान यशस्वीरित्या राबवूया, असेही त्यांनी सांगितले. आ. गोरे यावेळी म्हणाले, दुष्काळी भागावर असणारा दुष्काळ हा कलंक पुसला पाहिजे. इथला शेतकरी परिस्थितीशी लढाई करतो, संघर्ष करणारा आहे. जिहे कटापूर योजनेला गती देण्याची भावना पालकमंत्र्यांची आहे ते आल्यापासून प्रयत्न करत आहेत. माझ्या भागाला न्याय मिळावा आणि न्याय रडल्याशिवाय, नडल्याशिवाय मिळत नाही. म्हणून माझी भुमिका आग्रही असते.
प्रभाकर देशमुख म्हणाले, दुष्काळामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडते दुष्काळी भागात कायमस्वरुपी योजना आणण्याची संधी मला सचिव म्हणून काम करतांना मिळाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणी अडवता आणि जिरवता यावं त्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. येत्या काळामध्ये त्याचा खूप चांगला परिणाम पहायला मिळेल. जलयुक्त शिवार अभियान हे आता लोकांच्या मालकीचे झाले आहे, असेही ते शेवटी म्हणाले.
प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी मुद्गल म्हणाले, जलयुक्त शिवार अंतर्गत जिल्ह्यातील 215 गावांचा समावेश होता. लोकसहभागातून 6 हजार 474 कामे प्रस्तावीत होती. परंतु प्रत्यक्षात 7 हजार 500 कामे केलीत, ही कामे करतांना गुणवत्तापूर्ण कामे व्हावीत, यासाठी त्रयस्त यंत्रणेमार्फत तपासणी केली आहे. 25 हजार 163 टीसीएम पाणीसाठा निर्माण होणार आहे. यातून 6 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. चालू वर्षीही 210 पैकी 56 गावांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे, असेही ते म्हणाले. कार्यकारी अभियंता डी. वाय. कदम यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.