जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
सातारा, दि. 23 - सामान्य प्रशासन विभागातर्फे नागरी सेवा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, पाचगणीच्या मुख्याधिकारी विद्या पोळ यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नागरी सेवा दिनानिमित्त मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री एकनाथ खडसे, उद्योगमंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना उपस्थित होते.
विधिमंडळ, कायदेमंडळ व नागरी सेवा हे लोकशाहीचे तीन स्तंभ असून नागरी सेवेमुळे देश एकसंध राहील आणि तो देशाचा कणा म्हणून काम करेल हा सरदार वल्लभभाई पटेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला विश्वास सार्थ झाल्याचे दिसून येते. जलयुक्त शिवार, पाणंद रस्ते योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, इज ऑफ डुईंग बिझनेस, आपले सरकार पोर्टल, नाशिक कुंभमेळा नियोजन असे विविध उपक्रम प्रशासनाने यशस्वी करुन दाखविले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्याने देशाला एक नवीन विचार दिला असून येत्या पावसाळ्यानंतर या अभियानाची खरी फलश्रुती दिसेल, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.
यावेळी जलयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र आणि आपले सरकार वेब पोर्टल या उपक्रमांचे सादरीकरण झाले. अतिरित मुख्य सचिव डॉ. मीना यांनी प्रास्ताविक केले. शिल्पा नातू यांनी सूत्रसंचालन केले.