Breaking News

चिचोंडी पाटीलमध्ये रामजन्मोत्सव उत्साहात


अहमदनगर, दि. 17 -  चिचोंडी पाटील (ता.नगर) येथे रामनवमी निमित्त ग्रामस्थाच्यावतीने श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जन्मोत्सवानिमित्त सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यकर्माचे आयोजन करम्यात आले. राममंदीरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदीर गाभाऱयात मूर्तीची फुलांनी आकर्षक सजावट केली होती. गावातील सर्व भजनी मंडळानी मंदीरात भजने सादर केली. दुपारी बारा वाजता फटाक्याच्या आतषबाजी व मूर्तीवर पूष्पवृष्टी करुन जन्म सोहळा पार पडला. महिलानी पाळणे सादर करत तिर्थप्रसादाचे वाटप करुन राम जन्मसोहळ्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी गावातील युवकांनी माठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. रामनवमी निमित्त रात्री राममंदीरात नागतळा येथील आचार्य महादेव महारज शास्त्री याचे जाहिर हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले.