Breaking News

अहमदनगर महाविद्यालय सन्मानित

। मोस्ट प्रोमिसिंग डिग्री कॉलेजइन वेस्ट इंडिया पुरस्कार 

अहमदनगर, दि. 17 - उच्चशिक्षण स्तरावर स्वत:ची वेगळी व नाविन्यपूर्ण ओळख निर्माण करून शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणार्‍या अहमद
नगर महाविद्यालयाच्या कार्याची दखल दिल्लीतील  प्राईम टाईम रिसर्च मिडिया प्रायव्हेट ली. या संस्थेने  घेतली. व नुकताच त्यांनी मोस्ट प्रोमिसिंग डिग्री कॉलेज इन वेस्ट इंडिया पुरस्काराने अहमदनगर महाविद्यालस सन्मानित केले.
पश्‍चिम भारतातील उच्च विद्याविभूषित पदवी महाविद्यालय म्हणून मानाचे स्थानप्राप्त करणार्‍या अहमदनगर महाविद्यालयाच्या या यशा मागे प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस, उपप्राचार्य डॉ.सायमन बार्नबस,उपप्राचार्य डॉ. एन. आर. सोमवंशी,उपप्राचार्य पराग कदम,डॉ. एस. बी. अय्यर, रजिस्टर अरुण बळीद तसेच सर्व प्राध्यापक , कर्मचारी यांचे आथक परिश्रम असून या बद्दल सर्वस्तरातून महाविद्यालयाचे आभिनंदन होत आहे.