भगवान महावीर चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
अहमदनगर, दि. 21 - भगवान महावीर जयंतीनिमित्त कापड बाजार येथील आदर्श व्यापारी मित्र मंडळ व शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशन आयोजित भगवान महावीर चषक जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात सत्यम संघाने जय आनंद संघाचे सर्व गडी बाद करून 43 धावांनी विजय प्राप्त केला.
यावेळी झालेला पारितोषिक वितरण कार्यक्रमात औरंगाबादचे प्रमुख पाहुणे अॅड.अभय ओसवाल म्हणाले की महावीर जयंतीदिनी खेळांच्या माध्यमातून समाज व युवकांना एकत्र करण्याचा हा स्तुत्य उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु व्हावा.
उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, क्रिकेट बरोबरच इतर खेळहि सुरु करावेत. खेळातून खिलाडू वृत्ती व सांघिक भावना जोपासली जाते. महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की, श्री.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या नियोजित स्पोर्ट अकॅडमी साठी मनपा तर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल. प्रास्ताविक संजय चोपडा यांनी केले. सदभावना व एकी वाढावी या उद्देशाने आयोजित या स्पर्धांना चांगला प्रतिसाद दरवर्षी लाभत आहे. सर्वांचे सहकार्य व मदतीमुळेच या व अशासारखे विविध सामाजिक उपक्रम उत्तमरीत्या होत आहेत.विजयी सत्यम संघाचा कर्णधार नगरसेवक विपुल शेटिया व खेळाडूंना प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व पारितोषिक महापौर अभिषेक कळमकर, अॅड.अभय ओसवाल, व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे, आनंदराम मुनोत, रमेश बोरा, मीनाताई मुनोत, सुभाष गुंदेचा, रमेश पितळे, संजय चोपडा, केतन गुंदेचा, विकी मुथा, अनुपम संकलेचा व मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेत पहिला आलेला अतुल कानडे व डॉ.सागर सुरपुरे (आहारतज्ज्ञ) यांचा तसेच पंच व स्कोरर अजय कवीटकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मर्चंट बँक संचालक कमलेश भंडारी, अमित मुथा, हेमेंद्र कासवा, श्रीगोपाल धूत, मधुशेठ सारडा, चेतन बोगावत, योगेश मुनोत,अशोक बोरा, राहुल मुथियान व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन केतन गुंदेचा यांनी केले.भाऊसाहेब फिरोदिया शाळेचे मैदान उपलब्ध करून दिल्या बद्दल छायाताई फिरोदिया यांचे विशेष आभार मानण्यात आले.या उपक्रमासाठी कमलेश गुंदेचा ,सचिन मुथा यांनी विशेष परिश्रम घेतले.
आजच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये सत्यम संघाने जय आनंद संघाचा 43 धावांनी पराभव केला. सत्यम संघ 10 षटक : 6 बाद 105- प्रथम -31111 / जय आनंद : 9.4 षटकांत सर्वबाद 62 - द्वितीय - 21111 / मॉर्निंग अ- तृतीय - 11111 / वैयक्तिक : मॅन ऑफ द मॅच : रोहित जैन : 48 धावा (सत्यम ), बेस्ट बॉलर : किरण पितळे (सत्यम). बेस्ट फिल्डर : रितेश पारेख (जय आनंद),बेस्ट बॅट्समन : गौरव बोरा (जय आनंद) ,मॅन ऑफ द सिरीज : रोहित जैन (सत्यम)