Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आज मन की बात’ मधून जनतेशी संवाद साधणार

नवी दिल्ली, दि. 29 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. ‘मन की बात’चा आज 28 वा कार्यक्रम आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोदी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आचार संहिता लागू झाल्याने सरकारने निवडणूक आयोगाकडे या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती. निवडणूक आयोगाने या कार्यक्रमासाठी परवानगी दिल्यामुळे पंतप्रधान मोदी आज दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत.