Breaking News

प्रभागात मोफत रुग्णालय सुरु ः डागवाले

अहमदनगर, दि. 21 - समाजकार्य करीत असताना विघ्नसंतोषी लोक कामांत अडथळा आणत असतात. हे अडथळे पार करत मोठी कसरत करीत मोफत रुग्णालय सुरू  करण्यात मला यश आले. हे यश मिळविताना सर्व पक्षातील गटनेत्यांनी मला पाठबळ देऊन हे रुग्णालय सुरू करण्यासाठी सहकार्य केले. मोफत रुग्णालय सुरू झाल्याने  रुग्णांची चांगली सोय होणार आहे. 25 वर्षे मी राजकारणाबरोबरच समाजकारण करीत आहे. समाजाची माझी बांधिलकी आहे. त्यामुळे मला कोणी संपवू शकले नाही,  असे प्रतिपादन स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांनी केले.
शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने महाले मंगल कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या मो
फत रुग्णालयाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री.  डागवाले बोलत होते. याप्रसंगी मनपा आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर, संजय झिंजे, जालिंदर बोरुडे, रोहन लेंडकर, रोहन डागवाले, विशाल भालेराव, आशाताई  डागवाले, सुभाष दारवेकर, शहाजी डफळ उपस्थित होते.श्री. डागवाले पुढे म्हणाले की, विविध आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर्स या रुग्णालयास भेटी देऊन रुग्णांची तपासणी  करतील. रुग्णांना आजच्या महागाईच्या व महागड्या वैद्यकीय सेवेच्या काळात दिलासा मिळू शकेल, असे ते म्हणाले.ंडॉ. राजेंद्र शिंदे म्हणाले की, श्री. डागवाले यांनी  अथक प्रयत्नानंतर हे मोफत रुग्णालय सुरू केले आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. पैशांअभावी उपचार घेण्याकडे नागरिक दुर्लक्ष करतात. आता त्यांनी मोफत उपचार  घ्यावेत. या परिसरात सर्वसामान्य जनता वास्तव्यास असून, त्यांनी रुग्णालयाचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.