Breaking News

म्हणून मी सलामीला आलो : विराट कोहली

कानपूर, दि. 27 - इंग्लंडविरुद्ध कानपूरमधील पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ओपनिंग करुन सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला. इंग्लंडने टॉस जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. टीम इंडियातर्फे ओपनिंग करण्यासाठी कर्णाधार विराट कोहली आणि के एल राहुल मैदानात उतरले. परंतु विराट कोहलीचा हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला नाही. इंग्लंडने सात विकेट्स आणि 11 चेंडू राखून विजय मिळवला. कोहली 29 धावा करुन बाद झाला. परंतु या सामन्यात ओपनिंग का केली याचं कारण विराट कोहलीने सांगितलं आहे.
कोहली म्हणाला की, शिखर धवन फॉर्म नव्हता, तर के राहुलची कामगिरीत अजूनही फारशी सुधारणा नाही. मी आयपीएलमध्ये डावाची सुरुवात केली आहे. आयपीएल टी-20 क्रिकेट आहे. याबाबत मला माहित आहे, त्यामुळे मी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरलो. तिथे खास दिसण्यासाठी नाही. माझ्या ओपनिंगमुळे संघाला अतिरिक्त संतुलन मिळतं.   टी-20 आणि विशेषत: आयपीएलमध्ये मी अनेकदा सलामीला आलो आहे. माझ्यासाठी ही नवी गोष्ट नव्हती. अनेक वेळा सलामीची भागीदारी मजबूत होत नाही, तेव्हा आम्ही दुसर्‍या संघातून सलामीवीर आणू शकत नाही. आमच्यापैकीच कोणाला तरी ओपनिंगची जबाबदारी स्वीकारायला हवी.