कष्टकर्यांनी केलेला सत्कार हा दिशा देणारा : अतुल कानडे
अहमदनगर, दि. 21 - राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे आजपर्यंत अनेक सत्कार झाले. परंतु आज कष्टकर्यांच्यावतीने जो काही सत्कार झाला, त्याने आपण भरावून गेलो आहोत. झालेला हा सत्कार जीवनाला दिशा देणारा असच असेल, असे प्रतिपादन अतुल कानडे यांनी केले.
राज्यात एमपीएससीमध्ये प्रथम आलेल्या अतुल कानडे यांचा अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष शंकरराव घुले, उपाध्यक्ष गोविंद सांगळे, जन.सेक्रेटरी मधुकर केकाण, कॉ. बाबा आरगडे, सतीश शेळके, लक्ष्मीबाई कानडे, रोहिदास बनसोडे, नारायण गीते, दत्तात्रय भोजणे, केरबा पोळ, गजानन ससाणे, सचिन ठुबे, भास्कर जगदाळे, अर्जुन शिंदे, तबाजी कार्ले आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.कानडे म्हणाले, हमाल - माथाडी कष्टकर्यांनी सुद्धा आपल्या मुलांना स्पर्धा परिक्षेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यासाठी जिद्द आणि मेहनतीची गरज आहे. अशा परिक्षांमधून आपले पाल्यसुद्धा मोठमोठ्या पदावर विराजमान होवू शकतात. त्यासाठी त्यांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यास मी तयार असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शंकरराव घुले म्हणाले, सर्वसामान्य कुटूंबातील व्यक्तीही चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर मोठ्या अधिकार पदावर जावू शकते, हे अतुल कानडे यांनी मिळविलेल्या यशातून दिसून येते. त्यासाठी सर्वसामान्य मुलांनीही स्पर्धा परिक्षेत भाग घेवून आपली प्रगती साधावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन ठुबे यांनी केले तर आभार सतीश शे़ळके यांनी आभार मानले. कार्यक्रमास हमाल, मापाडी, कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.