जि.प.शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी शिक्षकांची पायपीट!
बुलडाणा, दि. 23 - येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये खिचडी शिजविण्यासाठी व विद्यार्थीना पाणी पिण्यासाठी शिक्षकांनाच 1 किमी पर्यंत पायपीटी करावी लागत आहे. विशेष म्हणजे शाळेसमोर असलेला हातपंप सुध्दा एक ते दोन महिन्यापासुन बंद पडलेला आहे. पण याकडे सुद्धा कोणाचेही लक्ष जात नाही. जिल्हा परिषद शाळेमध्ये एकुण 242 विद्यार्थी असल्यामुळे शिक्षकांना तीन ते चार तास नुसते पाणीच भरावे लागत आहे. गावाबाहेर असलेल्या शाळेमध्ये वृक्ष लावलेली आहेत. पण तेही पाण्यावाचुन करपुन चालली आहेत. शाळेमध्ये विद्यार्थीना पाणी पिण्यासाठी उरत नसल्यामुळे काही विद्यार्थी उन्हा तान्हात घरी जाऊन पाणी प्यायला जात आहेत . आणि विद्यार्थी वेळेतच येत नसल्यामुळे त्यांनचे शैक्षणिक नुकसान होत आहे गावाबाहेर च्या शाळेमध्ये बोरवेल मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापक शिक्षक वृंद मंडळी यांनी नमुद निवेदनाद्वारे ग्रामपंचायात कार्यालय यांना कळविले आहे. जिल्हा परिषद शाळेचा पाण्याचा प्रश्न सोडवा अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक वृंद मंडळी व ग्रामस्थांनकडुन होत आहे.