आ.राहूल बोंद्रे यांनी घेतली वरखेडची शाळा दत्तक
चिखली, दि. 23 - चिखली मतदार संघाचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या गरूडझेप शिक्षण प्रकल्पा अंतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून जवळपास 185 वर्ग ई-लर्नींगने कार्यान्वीत झाले असून त्याव्दारे शेतकर्यांची, कष्टकर्यांची मुले दर्जेदार शिक्षण घेवू लागली आहे. यासाठी शाळा विकासाबाबतची लोकसहभागाची चळवळ उभी राहीली आहे. आज जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारतो आहे. याचाच परिणाम म्हणून सदर शाळांची पटसंख्येमध्ये सुध्दा वाढ होतांना दिसत आहे. स्वत: आमदार बोंद्रे यांनी जि.प.शाळा वरखेड दत्तक घेवून एक आदर्श घडविला आहे.
अशाच लोकसहभागाच्या माध्यमातून नावारूपाला आलेली वरखेड येथील जिल्हा परिषद शाळा शैक्षणीक व भौतीक दृष्टीने सुसज्ज झाली असून सदर शाळेचा झालेला विकास निरंतर राहावा तसेच या शाळेची प्रेरणा इतर शाळांनी घ्यावी या उदांत्त हेतूने पे्ररीत होवून आमदार राहुल बोंद्रे यांनी मौजे वरखेड येथील ग्रामस्थांनी सदर शाळा दत्तक घेण्यात यावी यासाठी आ.बोंद्रे यांना साकडे घातले होते. त्याला प्रतिसाद म्हणून आमदार राहुल बोंद्रे यांनी मुलांच्या उज्वल भविष्यांचा, त्यांच्या शैक्षणीक प्रगतीची दखल म्हणून वरखेड शाळा दत्तक घेण्याला दुजोरा दिला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना आमदार राहुल बोेंद्रे यांनी उपस्थित अधिकारी, ग्रामस्थांना कठीण असलेल्या पवित्र कार्यास आपले सहकार्य तितकेच मोलाचे असल्याचे प्रतिपादन करून, उदयाचे सुसंस्कृत नागरीक घडविणार्या शाळा मंदिराच्या विकासासाठी सर्वांनी सातत्याने कटीबध्द राहावे असे भावनीक आवाहन केले.
सदर सभेचे प्रास्तावीक विस्तार अधिकारी जे.डी.काळे यांनी केले. यावेळी सरपंचपती सुनिल कणखर, श्शा.व्य. स. अध्यक्ष दत्ता चिंचोले, रविंद्र भगत, प्रमोद कणखर, देविदास कणखर, विनोद कणखर, ज्ञानेश्वर कणखर, अंबादास चिंचोले, श्शेषराव कणखर, श्रीराम कणखर, श्शरद कणखर, दत्तात्रय कणखर, बबन साळवे, महादू वाकोडे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थिीत होते. सर्व ग्रामस्थांनी जि.प.शाळा वरखेड दत्तक घेतल्याबध्दल आमदार राहुल बोंद्रे यांचे आभार मानले.