शंतनू सोनार यांचा 403 बैठकांचा विक्रम
अहमदनगर, दि. 17 - तोफखाना परिसरात नवरंग व्यायाम शाळेसमोर असलेल्या बलसागर जीममध्ये सलग 400 बैठकांचा विक्रमाची स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. या स्पर्धेत सुमारे 50 खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेत शंतनू सोनार याने 403 बैठकांचा विक्रम केला. नीलेश सुरेश वाडेर याने सलग 107 जोर मारले.
या खेळाडूंना जितेंद्र गांधी यांचे मार्गदर्शन लाभले. महापौर कळमकर यांनी जिमचे संचालक सागर सुरपुरे यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे महापौर कळमकर या जीमचे विद्यार्थी असल्याची आठवण सुरपुरे यांनी सांगितली. माजी उपमहापौर दीपक सुळ यांनी तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून दिले. आजची तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळत असल्याने पर्यायाने सर्वांचेच नुकसान आहे. त्यामुळे तरुणांनी व्यायामाकडे लक्ष दिल्यास व्यक्तीमत्व विकास आणि शारीरिक सदृढता वाढीस लागते, असे कळमकर यांनी यावेळी सांगितले.