शेतकरी व पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे साईबनमधील फुलांची शेती
अहमदनगर, दि. 17 - साईबन मधील कमी जागेत, कमी पाण्यात, ग्रीन हाउसमधे होणारी फुलशेती फायदेशीर असून शेतकरी व पर्यटकाचे आकर्षण ठरत आहे व हे पाहण्यासाठी मानकन्हैया शेती व पर्यावरणविषयक प्रशिक्षण केंद्राला भेट देत आहेत
डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया या दाम्पत्याने एम. आय. डी. सी शेजारी असलेली खडकाळ जमीन विकसित केली असुन या ठिकाणी सध्या फुलशेती केली जात आहे. त्यासाठी दहा हजार स्क्वे.फुटांचे चार पॉली हाउस आहेत. त्यामध्ये कार्नेशियन, जरबेरा, गुलाब, आर्किडची झाडे आहेत. बारा महिने फुल मिळते एक झाड दोन ते पाच वर्ष टिकते. कमी पाण्यात, कमी जागेत हि फायदेशीर शेती, लाखो रुपये उत्पन्न मिळून देते. हॉटेल , इंद्रस्ट्रीज व विविध कार्यक्रमांसाठी या फुलांना बाराही महिने आपल्याकडे व परदेशात मागणी असते. या फुलशेतीची काळजी मात्र मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागते . ठिबक सिंचनाची पद्धत वापरून पाणी तसेच वेळच्या वेळी कीटक नाशकाची फवारणी करावी लागते.
एकंदरीत फायदेशीर असलेल्या शेतीकडे लोकांनी वळावे. साईबन हिरवेगार वनश्रीने नटले असून वर्षभरात सुमारे 200 शालेय सहली व शेतकरी मंडळी भेट देण्यास येत आहेत. त्यांना माहिती केंद्राच्या वतीने पाणी अडवा, पाणी जिरवा, हरितगृहाची माहिती ,फळझाडे, फुलझाडाची माहिती देण्यात येत आहे. साईबनमध्ये याशिवाय अनेक आकर्षक वनाविन्यपूर्ण अशी विविध फुलेही आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचा वनश्री हा पुरस्कारही मिळाला आहे. नेत्र तज्ञ असलेले डॉ. दाम्पत्य हे सृष्टी चेही जतन करत आहेत. त्यामुळे साईबन आता पर्यटनस्थल बनले आहे. महाराष्ट्रातून लोक येउन आनंद घेतात. मोठ्या प्रमाणावर झाडी, असंख्य पक्षी, शांत रमणीय परिसर यामुळे हजारो पर्यटक असेच शेतकरी येथे भेट देतात. येथील फुले उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्याचे आकर्षण बनले आहे. साईबनमध्ये पपेटशो आणि उंटाची गाडी हे एक विशेष आकर्षण आहे.डोनाल्ड डक ,मिकी माउस व अलिबाबाची गुहा आणि उंच उंच टेकड्या, त्याच्या बाजूने जाणार्या रेल्वे गाडीचा कर्कश आवाज आणि मोहित करणारे परिसरातील संगीत ,जुन्या नव्या गाण्यांची रेलचेल हे सर्व आकर्षित काणारे आहेत.म्हणूनच नगर जिल्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटक मोठ्या संख्येने साईबानला येत आहेत निसर्गरम्य असणारे वातावरण तसेच झाडी व शुद्ध हवा यामुळे मन प्रसन्न राहते. नगर बरोबरच सर्व महाराष्ट्र तसेच शनि शिंगणापूर , शिर्डी येथून येणारे भाविक येथे भेट देतात.