दक्षिण अमेरिकेत इक्वेडोरशमध्ये भूकंप
अमेरिका, दि. 17 - दक्षिण अमेरिकेतल्या एक्वेडोर या शहराला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपाच्या धक्क्यात आतापर्यंत 41 जणांना मृत्यू झाला आहे. शहराला 7.8 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसल्यानं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणा
त जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. एक्वोडोरमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
मी टीव्हीवर चित्रपट पाहत असताना अचानक सगळं हलण्यास सुरुवात झाली. आम्ही लागलीच घरातून रस्त्यावर धावलो. काय होईल मला माहिती नव्हतं, असा अनुभव क्विटोतल्या लोरेना कझारेस यांनी सांगितला. या महाभयंकर भूकंपामुळे शहरातला एक पूलही कोसळला आहे. मंता शहरातल्या विमानतळावरचा टॉवरही कोसळला आहे. अनेक ठिकाणी टेलिफोनचे पोल कोसळून संपर्क तुटला आहे. सध्या लोक व्हॉट्सअपमुळे एकमेकांच्या संपर्कात आहेत. एका शॉपिंग मॉलमधल्या भिंतीलाही तडे गेले आहेत. या भूकंपामुळे एक्वेडोर शहराचं मोठं नुकसान झालं आहे. एक्वेडोर शहराला सुनामीचाही इशारा देण्यात आला आहे.