गारपिटीने नुकसान झालेल्यांना मदत द्याः सपकाळ
बुलडाणा (का.प्रतिनिधी) । 05 - वादळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकार्यांना करण्यात आली. बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय अंभोरे आणि आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात गुरुवारी सदर निवेदन देण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अलकाताई चित्रांगण खंडारे, मीनलताई आंबेकर, समाधान हेलोडे, दीपक रिंढे, जिल्हा परिषद सभापती अंकुश वाघ, गणेश बस्सी, डॉ. पुरुषोत्तम देवकर, आझाद हिंद संघटने अँड. सतीशचंद्र रोठे, नगरसेवक विनोद बेंडवाल, जाकीर कुरेशी, आकाश दळवी, गजनफर खान, मंजूर खान, बबलू कुरेशी, सुधाकर काळवाघे, गणेश बोचरे, प्रा. गोपालसिंह राजपूत यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. संकटग्रस्त शेतकर्यांना तात्काळ मदत न दिल्यास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला.