Breaking News

उर्दु पत्रकार संघातर्फे शासनाचा निषेध

 बुलडाणा (का.प्रतिनिधी) । 05 - महाराष्ट्र शासनातर्फे जाहिर करण्यात आलेल्या उत्कृष्ट पत्रकारीता 2015 पुरस्कारात यंदा उर्दु पत्रकारांना साबीर अली यांच्या नेतृत्वात निषेध केला आहे. या बाबत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद आहे की, दर वर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासनातर्फे यंदा 2015 उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहिर करण्यात आला. बातमी वचुन आनंद झाला. पण हे कळले नाही की, शासनाने उर्दु पत्रकारीतेला या पुरस्कारापासुन का आणि कसे वगळले. भारताचा ईतीहास साक्षी आहे की, उर्दु पत्रकारीतेने देशाला स्वातंत्र्य मिळविणेपासुन आज पर्यत पत्रकरीतेच्या क्षेत्रात महत्वपुर्ण भुमिका बजावली आहे.
आम्ही महाराष्ट्र उर्दु पत्रकार संघ, बुलडाणा जि.बुलडाणा तर्फे शासनाने जाहिर केलेल्या  उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार 2015 मध्ये उर्दु पत्रकारांचा समावेश न केल्याबद्दल जाहिर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आणि शासनाला निवेदन देण्यात येते की, उर्दु पत्रकारांकडुन प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करून पुरस्कार जाहिर करावे. वरील बाबीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा ही विनंती. असे न झाल्यास लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर साबीर अली-अध्यक्ष बुलडाणा, फीरोज शहा-उपाध्यक्ष मेहकर, अमिनशाह-उपाध्यक्ष सा.खेर्डा, सलीम खान-सचिव मोताळा, शेख इद्रीस-संघटक-दे.घाट, कासीम शेख-दे.घाट, अशरफ पटेल-दे.राजा, इफतेखार खान-चिखली, मो.तौफिक-चिखली, तनजीम 
हुसैन-चिखली, शेख नाजीम-धाड, मो शफि-धाड, आसीम मिर्झा-बुलडाणा, मोसीन शेख बुलडाणा, शेख आसीफ-धाड यांच्या सह्या आहेत.