गारपिट ग्रस्तांचा बांधावर जाऊन सर्वे कराः खा.जाधव
बुलडाणा (का.प्रतिनिधी) । 05 - फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आवकाळी पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागात तांडव केले. वादळ व गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाले असुन घरांचीही पडझड झाली आहे. शासनाने गारपिट ग्रतांना मदत जाहीर केली आहे. मात्र घरी बसुन सर्वे न होता गारपिटग्रस्तांच्या शेताच्या बांधावर जाऊन सर्वे करण्यात यावा. यासंदर्भाचे आदेश यंत्रणेला व्हावेत अशी सुचना खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून खा.प्रतापराव जाधव यांनी नुकसानीची माहीती जानुन घेतली. दिल्ली येथे लोकसभेचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असल्याने दुरध्वनीव्दारे खासदार जाधव यांनी जिल्हाप्रशासनाकडुन गारपिटीचा आढावा घेतला. दुष्काळामुळे खरीप हंगाम हातुन गेल्याने शेतकरी वर्ग अडचनीत आला आहे. त्यामुळे रब्बीत थोडी फार आशा उत्पादनासंदर्भात शेतकरी बांधव ठेवून होते. गारपिटीने मात्र रब्बीलाही नुकसान पोहचवले आहे. गहु, हरभरा, कांदा, मका यासह डाळींब, संत्रा फळपिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून नुकसानीचा वस्तुनिष्ठा सर्वे होणे आवश्यक आहे. यंत्रणेला घरी किंवा कार्यालयात बसून सर्वे न करता थेट नुकसान ग्रस्तांच्या शेताच्या बांधावर जाऊन सर्वे करण्यात यावा यासंदर्भाचे आदेश यंत्रणेला व्हावेत अशी सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. तव्दतच शेतकर्यांनीही नुकसानीच्या सर्वे करण्यासाठी संबंधीतांना माहिती द्यावी. नोकरशाहीने सर्वे साठी टाळाटाळ केल्यास खासदार जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन खासदार जाधव यांनी केले आहे.
पिकविमा धारक शेतकर्यांनी संपर्क साधावा 2014-15 साठी जिल्ह्यातील 1 लक्ष 85 हजार शेतकर्यांनी पिक विमा भरला होता. 1 लक्ष 55 हजार हेक्टर क्षेत्र यात समाविष्ट झाले होते. यासाठी 12 कोटी 61 लक्ष रू विम्याची रक्कम शेतकर्यांनी नगदी स्वरूपात किंवा तसेच कृषी कर्जातुन बँकामध्ये भरली होती. त्यपैकी 1 लाख 73 हजार शेतकर्यांना 1 कोटी 64 लक्ष रूपयेच विम्याचा लाभ मिळाल्याची कृषी विभागाची माहिती आहे.
त्यामुळे 2014-15 मध्ये कृषी पिकविमा काढुनही पैसे न मिळालेल्या शेतकर्यांनी बँकेची पावती व इतर पुराव्यासह खासदार जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.