Breaking News

गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्तधर्मियांची उपासना

 जामखेड। प्रतिनिधी । 27 - गुड फ्रायडेनिमित्त नगर शहरासह जिल्ह्यात ख्रिस्तधर्मियांनी  शुक्रवारी चर्चमध्ये जाऊन उपासना केली. चाळीस दिवसांपासून सुरू असलेले पवित्र उपवास परमेश्‍वराला अर्पण करून यावेळी सोडण्यात आले. धर्मगुरूंनी यावेळी धार्मिक संदेश देत समाज शांततेची व एकात्मतेची प्रार्थना केली. प्रभू येशू यांचे वधस्तंभावरील शेवटचे सात शब्द हा संदेशाचा मूळ गाभा राहिला. प्रभू भोजनाचा विधी देखील यावेळी झाला. 
ख्रिस्त धर्मामध्ये गुड फ्रायडे या दिनाला विशेष महत्त्व असते. त्यासाठी चाळीस दिवसांचे पवित्र उपवास धरले जातात. ख्रिस्तधर्मियांची दहा फेब्रुवारीपासून पवित्र उपवासाची सुरूवात झाली. या दिवसाला राखेचा बुधवार म्हणून ख्रिस्त धर्मात संबोधले जाते. या चाळीस ख्रिस्त धर्मियांसाठी दु:खाचे दिवस असतात. त्यामुळे या चाळीस दिवसांच्या उपवासात मासांहार होत नाही. उत्सव व कार्यक्रम होत नाही. या दिवसांचे स्वरूप हे पवित्र दु:खांचे असे असते. या उपवासांच्या दिवसात हलका आहार सेवन केला जातो. विशेष करून फलाहार घेतला जातो. या उपवासांच्या दिवसात रोज सायंकाळी भक्ती उपासना केली जाते. गुड फ्रायडेच्या दिवशी हे उपवास परमेश्‍वर चरणी अर्पण केले जातात. त्यापूर्वीच्या रात्री आज्ञा गुरूवार म्हणून शिष्यांचे पाय धुणे हा पवित्र पाळण्यात येतो. यावेळी उपासना होते.गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्तधर्मियांची उपासना नगर शहरासह जिल्ह्यातील चर्चमध्ये या उपासनेसाठी गुरूवाराच्या रात्री ख्रिस्तधर्मियांनीगर्दी केली. 
या उपासनेनंतर  शुक्रवारी सात शब्द व प्रभू भोजन हे दिले गेले. त्यासाठी देखील चर्चमध्ये आज सकाळपासून भाविकांची गर्दी होती. भिंगार येथील क्राईस्ट चर्च व संत जॉन चर्च, संत आन्ना चर्च, भिंगार, ह्यूम मेमोरिअल चर्च, संत डॉन बॉस्को चर्च, गॉर्डन हॉल चर्च, सीएनआय चर्च, तारकपूर येथील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल या चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजल्याच्या सुमारास भाविकांनी उपासना केली.ईस्टर संडे साजरा करण्याची तयारी सुरूप्रभू येशू वधस्तंभावर गेल्यानंतर तीन दिवसानंतर पुन्हा जिवंत झाले. ख्रिस्तधर्मिय हा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा करतात. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व स्नेहभोजन दिले जाते. प्रभू येशूचा मरणावरील विजय हा संदेश या दिवशी दिला जातो. या दिवसाच्या होणार्या कार्यक्रमांचे नियोजन चर्चमध्ये सुरू झाले आहे.