पाठपुराव्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय : पाचपुते
श्रीगोंदा । प्रतिनिधी । 27 - कुकडीच्या पिण्याच्या पाण्यासाठी मागील काही दिवसापासून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्याने आवर्तनाचा निर्णय झाल्याचा दावा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला असून तालुक्यात भीषण टंचाईची परिस्थिती असून जळालेल्या फाळबागांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकर्यांना शासकीय मदत तसेच पशुधन वाचविण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिल्याची माहिती तसेच यापूर्वी ज्या तलावात टंचाई काळात पाणी सोडले जात होते यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याची माहिती माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुकडी धरण साठ्यात टंचाई वर मात करण्याइतका पाणीसाठा असल्याचे जलसंपदा मंत्र्याच्या निदर्शनात आणून देवून तातडीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कालवा सल्लागार समितीची 23 रोजी झालेल्या मिटिंग मध्ये पिंपळ्गाव जोगा मधील मृत पाणीसाठा काढल्याशिवाय आवर्तन होणार नाही हे मी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले तेथील आमदारांचा विरोध असतानाही हा निर्णय घेण्यात आला आता येणार्या आवर्तना मधून इकडे तिकडे पाणी वाया जाण्यापेक्षा तालुक्यातील मागे भरलेल्या सर्वच तलावात पाणी सोडल्यास त्या तलावातून पाणी उपसा करून शेतकरी पिण्याची तहान भागवून फळबागा हि वाचवू शकतात. यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मी लोकप्रतिनिधी असताना येथील सर्वच अनुभव शून्य राजकीय नेत्यांनी मी तालुक्याचे वाळ्वंट केले असे बोलून तोंड सुख घेतले पाचपुते हाटाव असा नारा दिला प्रत्यक्ष त्या काळात 32 लाख ताणाचे उत्पन मिळाले केळी द्राक्ष, लिंबू, संत्रा, चिकू, डाळिंब आदीच्या माध्यमातून तालुक्यात कोट्यावधीची झालेली उलाढाल या टीका करणार्या दिसली नाही आज तालुक्यात हजारो टँकरच्या माध्यमातून शेतकरी फळबागा जगविण्यासाठी प्रयत्नशील आहेत हे तरी त्यांना दिसते काय ?असा टोला पाचपुते यांनी सर्वच विरोधकांना लगावला आहे
भीमा नदीवर नगर जिल्ह्याच्या हद्दीमधील चार बंधारे कोरडे पडले आहेत या बंधार्या मधून सुमारे 3 ते 4 हजार पाईप लाईन बंद पडल्याने घोड लाभधारक उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे त्यासाठी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट दौंड चे आमदार राहुल कुल तसेच शिरूर चे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्याशी संपर्क ठेवून भीमा आस्केड धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि मुख्यमंत्री यांना भेटून तो हि प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे
श्रीगोंदा शहराला घोड धरणातून केलेल्या पाईप लाईन काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच शहराला शुद्ध पाणी देण्याचा केलेल्या प्रयत्नाला ज्यांना याबाबत काहीच घेणे देणे नाही चांगल्या कामाला विरोध करणार्या प्रवृत्तीमुळे दिरंगाई झाली असली तरी या नळ योजनेमुळे श्रीगोंदा शहराचा पुढील 100 वर्षाचा पाणी प्रश्न सोडविल्याचे समाधान वाटत आहे, असे पाचपुते यांनी सांगितले.