Breaking News

स्कॉर्पिओमधून सुमारे तीन कोटी रुपये जप्त !

मुंबई, 05 - मुंबईजवळच्या भिवंडीमध्ये एका स्कॉर्पिओमधून सुमारे तीन कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले पैसे हवालाचे असून ते गुजरातहून मुंबईला आणण्यात येत होते, असा पोलिसांचा अंदाज आहे. 
पोलिसांनी गाडीची झडती घेतल्यानंतर त्यांना स्कॉर्पिओमधील मागील सीटच्या खाली लॉकर बनवून आरोपींनी दोन कोटी 85 लाख रुपये लपवल्याचे निदर्शनास आले. नोटांचे गठ्ठे जप्त केले असून दोन आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, हे पैसे गुजरातहून मुंबईत आणण्यात येत होते. अटक केलेल्या दोन्ही आरोपींकडून या पैशांचा मालक कोण आहे, याची चौकशी पोलिस करत आहे.