अल्ट्रा प्युअर फेम कंपनी भीषण आगीत जळून खाक
मुंबई, 05 - ठाण्यातील डोंबिवली एमआयडीसीमधील अल्ट्रा प्युअर फेम कंपनी भीषण आगीत जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी 10.30 च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसीत असलेल्या अल्ट्रा प्युअर फेम कंपनीला किरकोळ आग लागली. मात्र, नंतर ही आग भडकत गेली. तसेच शेजारीच सिलेंडर गॅसचे गोदाम असल्याने ही आग तेथे पोहताच सिलेंडर टाक्यांचे स्फोट झाले व आगीचे भीषण आगीत रूपांतर झाले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 4 गाड्या मागवल्या होत्या मात्र, आगीचे रूद्र रूप पाहून आणखी 8 गाड्या मागवल्या. अखेर 12 गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न झाला. तास-दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली होती. यामुळे कंपनीचे कोट्यावधीचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.