पंचपीर चावडी येथे दोघांना तलवारीने मारहाण
अहमदनगर । प्रतिनिधी । 05 - लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन पंचपीर चावडी येथे वसिम अब्दुल सैफ बागवान व अब्दुल सैफ बागवान (रा. पंचपीर चावडी) यांना जमावाने तलवारीने मारहाण करून जखमी केले. पंचपीर चावडी येथे घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लहान मुलांना मोठया महिलांनी मारहाण का केली? अशी विचारणा करुन पाच जणांच्या जमावाने तलवार, लोखंडी पाईप, गज, फायटर, दगड, विटा व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत वसिम अब्दुल सैफ बागवान व अब्दुल सैफ बागवान हे दोघे पिता पुत्र जखमी झाले. पंचपीर चावडी येथे गफ्फार शेख याने बागवान यांना तुमच्या घरच्या स्त्रियांनी आमच्या मुलांना मारहाण का केली? अशी विचारणा करुन त्या रागातून मारहाण केली. याबाबत कोतवाली पोलिसांनी अश्पाक शेख, भुर्या गफ्फार शेख, मोहिन गफ्फार शेख व ढब्बु शेख, गफ्फार शेख यांचा जावई यांच्याविरुध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सय्यद हे करीत आहेत.