उमर खालिद, अनिर्बाणला सहा महिन्याचा जामीन
नवी दिल्ली, 18 - देशद्रोहाचा आरोप असलेले जेएनयूमधील विद्यार्थी उमर खालिद आणि अनिर्बाण भट्टाचार्य यांना पटियाला हाऊस कोर्टाने सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. दोघांना 23 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. कोर्टाने त्यांना प्रत्येकी 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जमीन मंजूर केला आहे.
याआधी कोर्टाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 18 तारखेपर्यंत राखून ठेवली होती. त्यांनी जामीन अर्जात म्हटले होते, की तपास संस्थांना अद्याप ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यासोबतच कन्हैया कुमारला जामीन मिळला आहे. त्याप्रमाणेच आमचीही जामीनावर सुटका केली जावी. दरम्यान, जेएनयूच्या चौकशी समितीने उमर खालिद आणि अनिर्बाण भट्टाचार्य यांना विद्यार्थ्यांमध्ये सांप्रदायिक, जातीय आणि प्रांतीय भावना भडक
ावल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यांना वातावरण बिघडवण्याबद्दलही दोषी धरण्यात आले. चौकशी समितीने विद्यापीठाचे नियम आणि शिस्तभंग केल्याबद्दल ज्या 21 विद्यार्थ्यांना दोषी ठरवले आहे त्यात अनिर्बाण आणि उमर यांचाही समावेश आहे. समितीने विद्यार्थी संघटनेतील अभाविपचे एकमेव सदस्य आणि संयुक्त सचिव सौरभ शर्मा यांना कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक रोखण्याबद्दल दोषी ठरवले आहे. सौरभनेच देशविरोधी घोषणांची तक्रार पोलिसांत केली होती.
