Breaking News

पवित्र कुराणचा संदेश लक्षात ठेवा - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 18 - दहशतावादाचा सामना म्हणजे कोणत्याही धर्माशी केलेला सामना नसतो, धर्म आणि दहशतवाद यांना वेगवेगळे केले पाहिजे अशी गरज त्यांनी वर्तवली. जेव्हा हिंसेची सावली मोठी होत जाते तेव्हा सूफी म्हणजे आशादायी किरण असल्याचे मोदी म्हणाले. 
 बंदुकींमुळे जेव्हा लोकांचे आवाज बंद होतात तेव्हा सूफी संतांचा आवाज सर्वांना आशा देतो, अशा शब्दांत मोदींनी सूफी परंपरेचे कौतुक केले. गुरुवारी ते नवी दिल्लीत सुरू झालेल्या जागतिक सूफी परिषदेत बोलत होते.
प्रत्येक धर्मात असलेल्या चांगल्या मूल्यांच्या आधारे आणि धर्मांनी दिलेल्या वास्तववादी संदेशानुसार आतंकवादावर विजय मिळवण्याची आशा मोदी यांनी व्यक्त केली. धर्माच्या नावावर दहशतवाद पसरवणारे लोक धर्मविरोधी असल्याची टीकाही मोदी यांनी केली. देशात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून धार्मिक तणाव वाढत असल्याचा आरोप विरोधक करत असतानाच मोदींतर्फे अशी विधाने आली आहेत. सूफी परंपरेने आजही मोहम्मद पैगंबर आणि इस्लामच्या मूळांना धरुन ठेवले असल्याचे मोदी म्हणाले. मोहम्मद पैगंबरांचे कोणतेही नाव ताकद किंवा हिंसेशी संबंधित नसल्याचे मोदी यांनी सांगितले.