Breaking News

दुचाकींची समोरासमोर धडक; दोन तरूण ठार

बीड, 18 -  बीड-पिंपळनेर रस्त्यावरील अंथरवणपिंप्री तांड्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
राधाकिसन उर्फ पिनू कारभारी मोरे (24, रा. बेलवाडी, ता. बीड), विष्णू लिंबाजी कांबळे (वय 20, जैताळवाडी, ता. बीड) अशी मयतांची नावे आहेत. पिनू हा बाभूळवाडी ग्रा.पं.च्या सदस्य चंपाबाई मोरे यांचा मुलगा होता.तो दुचाकी (एमएच 23 एस 6175) वरून बीडहून परतत होता तर कांबळे हा दुचाकी (एमएच 23 एजी 7683) वरून बीडकडे येत होता.त्यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये गंभीर जखमी होऊन मोरे जागीच गतप्राण झाला. कांबळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.