वेश्या व्यवसायाचा अधीक्षकांच्या पथकाने केला पर्दाफाश
बीड, 18 - शहरातील शाहूनगर भागातील एका लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा अधीक्षकांच्या पथकाने पर्दाफाश केला होता. पथकाच्या छाप्यानंतर लॉजमालकास पकडण्यात शिवाजीनगर ठाण्याचे निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी विलंब केला. त्यामुळे अधीक्षक अनिल पारसकर यांनी त्यांच्याकडे रविवारी खुलासा मागविला आहे.
10 मार्च रोजी रात्री एक तरुणी, दोन आंटींसह एक तरूण ओंकार लॉजमधील एका खोलीत आढळले होते. अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गजानन जाधव यांनी तेथे छापा टाकला. याप्रकरणी लॉज व्यवस्थापकासही अटक केली हाती. मात्र, छाप्यावेळी लॉजमालक महादेव सानप तेथे नव्हता. त्याला रात्रीतून ताब्यात घेणे आवश्यक होते;परंतु निरीक्षक कस्तुरे यांनी दिरंगाई केली, त्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला, असा ठपका कस्तुरेंवर आहे.