अमृता फडणवीस यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. प्रकाश झा यांच्या आगामी ‘जय गंगाजल’ चित्रपटासाठी अमृता यांनी पार्श्वगायन केले आहे.
यशस्वी बँकर, होममेकर इथपासून सुरु झालेला अमृता फडणवीस यांचा प्रवास आता बॉलिवूडपर्यंत येऊन पोहचला आहे. यापूर्वी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ चित्रपटासाठी पार्श्वगायन केले होते. मात्र जय गंगाजलमुळे त्यांच्यासाठी बॉलिवूडची कवाडे खुली झाली आहेत. अमृता फडणवीस यांनी चित्रपटात मुख्य व्यक्तिरेखा साकारणार्या प्रियंकासाठी आवाज दिला आहे. बॉलिवूडमधील आघाडीचा गायक अरिजीत सिंग याच्यासोबत त्यांनी ‘सब धन माटी’ हे द्वंद्वगीत गायले आहे.