Breaking News

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाची जीभ कापणार्‍याला 5 लाखांचे बक्षीस- कुलदीप वाष्णेय

बदायूँ, 05 - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने कारागृहातून बाहेर आल्यानंतर सरकारवर जोरदार टीका केल्याने भाजप नेत्याने कन्हैयाची जीभ कापून आणणार्‍याला पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. 
भारतीय जनता युवा मोर्चाचे बदायूँ जिल्हाध्यक्ष कुलदीप वाष्णेय यांनी कन्हैयाने केलेल्या वक्तव्यांवर नाराजी दर्शवित हे बक्षीस जाहीर केले आहे. देशविरोधी आणि दहशतवादी अफजल गुरुचे समर्थन करणारा कन्हैया सुटकेनंतर प्रत्येकावर टीका करत असल्याचे कुलदीप यांनी म्हटले आहे. कन्हैयाने कारागृहातून बाहेर आल्यानंतर जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना मोदी सरकार, आरएसएसवर जोरदार टीका केली होती.